अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकविला आहे. सभापतीपदी गीतांजली पाडळे, तर उपसभापती रजनी देशमुख यांनी निवड झाली आहे.हा निकाल माजीमंत्री पाचपुते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
श्रीगोंदा पंचायत समिती च्या सभापती उपसभापती निवडीत भाजपच्या पंचायत समिती सदस्या आशा सुरेश गोरे यांनी एन वेळी काँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला.
माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांना धक्का देत राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनी आज झालेल्या पंचायत समितीच्या सभापतीपदी गीतांजली शंकर पाडळे तर
उपसभापती पदी रजनी सिद्धेश्वर देशमुख यांची निवड करून पंचायत समिती वर काँग्रेस-राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीचा झेंडा फडकवला.
श्रीगोंदा पंचायत समिती मध्ये भाजपचे ७ , तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ५ सदस्य होते. पंचायत समिती ही भाजपच्या ताब्यात होती.
भाजपचे सदस्य अमोल पवार यांचे जात पडताळणी वेळेत सादर न केल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे भाजप चे ६ व आघाडीचे ६ असे संख्याबळ झाले होते.