धक्कादायक…. अहमदनगर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सात जण कोरोनाबाधित !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मुंबईहून आलेले एकाच कुटुंबातील ७ जण बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते मूळचे अहमदनगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथील रहिवासी आहेत.

हे कुटुंब मुंबईहून थेट आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण येथे नातेवाईकांकडे आले होते, दि. १४ तारखेला आल्यानंतर त्यांना शेतात क्वारंटाईन केले. २ दिवसांपासून त्यांना लक्षणे जाणवू लागली.

बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . आर . बी. पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पथक पाठवून या कुटुंबाला बीड जिल्हा रुग्णालयात आणले.

शनिवारी रात्री त्यांचा स्वब घेतला. यामध्ये सातही लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शनिवारी माजलगाव तालुक्यातील हिवरा व गेवराई तालुक्यातील इटकूर येथे दोन कोरोनाबाधित आढळले होते .यामुळे बीडच्या करोनाबाधितांची संख्या आता 9 झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24