अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-थंडीचा मौसम सुरु झाला आहे, अनेकजण भ्रमंतीसाठी बाहेर पडू लागले आहे. यातच समुद्र किनाऱ्यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
मात्र अशाच एका समुद्र किनारी फिरायला गेलेले तरुण पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली.
सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत. स्थानिकांच्या मदतीने तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पुण्यातील औंध येथील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे,
विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह १४ पर्यटक फिरण्यासाठी दापोली तालुक्यात आले होते. हे पर्यटक आज १८ डिसेंबर दुपारच्या वेळी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर गेले होते.
दरम्यान, पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे सहाही पर्यटक पाण्यात बुडाले. दरम्यान सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.