औरंगाबाद :- शहरातील कुंदवाडी परिसरातील तोरणागड म्हाडा कॉलनीत एका १३ वर्षीय मुलीसह नर्सचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळला.ही हृदयद्रावक घटना शनिवारी (दि.१८) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान कौटुंबिक कलहातून मुलीला झोपेच्या गोळ्या आणि इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्यानंतर स्वत: त्याच गोळ्या, इंजेक्शन घेऊन त्यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.
आशा दीपक गायकवाड (३३) तोरणागड परिसरातील खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या. गेल्या आठ वर्षांपासून पतीपासून विभक्त राहत असत.त्यांना १३ वर्षांची ऋतुजा नावाची मुलगी आहे.
कौटुंबिक वादातून त्या नैराश्यात होत्या. शनिवारी रात्री ९ वाजता याच भागात राहणाऱ्या त्यांच्या भावाने मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्याने घरी येऊन पाहिले, तर आतून दरवाजा लावलेला होता.
त्यांनी बाजूच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता आशा आणि ऋतुजा संशयास्पद अवस्थेत पडलेल्या दिसल्या. त्याने तातडीने मुकुंदवाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.पोलिसांनी त्यांना घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार आशा गायकवाड यांनी स्वत: मुलीला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या त्यानंतर त्यांनी मुलीला इंजेक्शन दिले. स्वत:ही त्याच गोळ्या खाऊन तेच इंजेक्शन आपल्या डाव्या हातात घेतले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®