अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज त्यांच्या कार्यामुळे जनता आपले कामकाज निर्धास्त पार पाडत आहे.
परंतु अहमदनगरमध्ये डॉक्टरने नर्सचा विनयभंग केल्याची घटनाघडल्याने या पेशास काळिमा फासण्याचे काम झाल्याचे बोलले जात आहे.
गणपत ऊर्फ बबलू भाऊसाहेब जाधव (रा. नांदगाव ता. राहुरी) असे डॉक्टर आरोपीचे नाव असून तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल फिर्याद दाखल झाली आहे.
अधिक माहिती अशी: दुपारी अडीचच्या सुमारास सदर नर्स या प्रेमदान चौकातून रस्त्याने पायी चालल्या होत्या. यावेळी बबलू जाधव हा त्याच्या दुचाकीवरून आला व फिर्यादीचा हात पकडून दुचाकीवर बस असे म्हणत
त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. ऐकले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान आरोपी जाधव याला पिडीत नर्सच्या तक्रारीवरून दोन दिवसापूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात बोलवून घेत समज दिली होती.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved