अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : नगर शहरातील सारसनगर येथे नव्याने ५८ वर्षीय कोरोना रुग्ण सापडला. परंतु त्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णाचा अहवाल हा मुंबईमध्येच पॉझिटिव्ह आला होता.
मात्र त्यानंतरही या रुग्णाला त्या ठिकाणीच उपचार मिळणे आवश्यक असताना केवळ हातावर शिक्का मारून नगरला पाठवण्यात आले. मात्र यानिमित्ताने पॉझिटिव्ह पेशंट मुंबईवरून नगरमध्ये येतोच कसा, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
नगरच्या सारसनगर भागांमध्ये ५८ वर्षीय व्यक्ती करोना बाधित आढळून आलेला आहे. या व्यक्तीस मुंबई येथे संबंधित व्यक्तीला कर्करोगावर उपचार करण्यासाठी नेले होते.
तेथे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्या व्यक्तीवर तिथेच उपचार सुरू करण्याऐवजी त्याठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला पुन्हा नगर येथे पाठवण्याचा निर्णय घेतला व त्याच्या हातावर शिक्का मारून त्यांना नगर येथे पाठवण्यात आले.
संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे येथील प्रशासनाला कळवण्यात आले . त्यानुसार प्रशासनाने आज नगरमध्ये संबंधित व्यक्ती आला असून तो करोना बाधित असल्याचे जाहीर केले व त्याच्यावर उपचार सुरू केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews