अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-देशात गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाचे संकट आहे, यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे दरम्यान पैसे कमवण्यासाठीच माणूस आता काहीही करू लागला आहे.
नुकतेच रत्नागिरी मध्ये बनावट नोटा छापणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, चिपळूणात बनावट नोटांची छापाई करून त्या नोटा ठाण्यात घेऊन आलेल्या टोळीच्या म्होरक्याला ठाणे पोलिसांनी पकडले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तिघांना दोघांना अटक केली आहे. त्यातिघांकडून 85 लाख 48 हजार रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
चिपळूण कळंबट येथील सचिन आगरे याने संगणक आणि प्रिंटरच्या सहाय्याने गावातच दोन हजार रूपयांच्या बनावट नोटांची छपाई सुरू केली.
दोन हजारच्या बनावट नोटा वटविण्यासाठी सचिन आगरे ठाण्यात गेला होता.सचिन आगरेची हि खबर पोलिसांना लागली. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सचिन आगरे याला रंगेहाथ पकडले.
चौकशीनंतर पोलिसांनी आगरेच्या मन्सूर खान आणि चंद्रकांत माने या दोघा साथीदारांना अटक केली. यातिघांकडून तब्बल 85लाख 48 हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. बनावट नोटांचे धागेदोरे चिपळूण पर्यंत पोहचल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
स्कॅनर,प्रिंटर आणि संगणकाच्या सहाय्याने बोगस नोटा हुबेहुब बनविल्या जात असल्याने हा बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीने अजून कुठे ह्या बनावट नोटा वटविल्या आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.