अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- सांगली जिल्ह्यामधील इस्लामपूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका महाविद्यालय तरुणावर एका पोलीस कर्मचाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
हणमंत कृष्णा देवकर (वय ३४) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेमुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.
नेमके काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर इस्लामपूर शहरामध्ये 27 ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास इस्लामपूर पोलिसांची गस्त सुरू असताना इस्लामपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी हनुमंत देवकर एका अन्य पोलिस कर्मचाऱ्याला एक महाविद्यालयीन तरुण आढळून आला.
त्याच्याकडे देवकर यांनी चौकशी केली असता सदर तरुणाने आपल्या मैत्रिणीला भेटून आपल्या वस्तीगृहावर जात असल्याचे सांगितले. यावर पोलीस कर्मचारी देवकर याने सदर तरुणाचा मोबाईल क्रमांक घेऊन त्याला सोडून दिले होते.
त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी देवकर याने सदर तरुणाला गाठून त्याच्या मैत्रीणी बरोबर असणारे संबंध त्याचा व संबंधित तरुणीच्या घरच्यांना सांगण्याची धमकी देत, त्याच्याकडून 4 हजारांची खंडणी घेतली. आरोपीने त्यांनतर त्या मुलाला तुझ्या मैत्रिणीचा नंबर मला दे आणि तिला माझ्यासोबत संभोग करायला सांग असे सांगितले .
त्यावेळी त्या मुलाने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावेळी आरोपी हणमत देवकरने पिडीतास तू मला तुझ्या मैत्रिणीसोबत जर संभोग करायला देत नसशील तर मी तुझ्या सोबत संभोग करायचा आहे असे म्हटले. आरोपीने पिडीत मुलाला त्याच्या रुमवर घेऊन जाण्यास सांगितले.
त्यानंतर पिडीत तरुणाने त्याने त्याच्या मित्राला दुसऱ्या रूममध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी हणमंत देवकरने पिडीत मुलाबरोबर अनैसर्गिक संभोग केला व त्याचे व्हिडीओ शूटिंग केले. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित तरुणाने इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये इस्लामपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी असणाऱ्या हणमंत देवकर,
(वय 34 वर्ष) याच्याविरोधात अनैसर्गिक अत्याचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी हणमंत देवकर अटक केली आहे.