धक्कादायक! मुंबईतील ‘त्या’ शवगृहात वेटिंग लिस्ट;मृतदेह बाहेरच..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या शवगृहाबाबत धक्कादायक माहिती समोर अली आहे. हे शवगृह पूर्णपणे भरले असून त्या बाहेर 25 मृतदेह ठेवण्यात आले आहेत.

गेले काही दिवस मुंबईत कोरोना बाधित लोकांना रुग्णालयात बेड उपलब्ध नाही अशी ओरड होत होती. पण आता मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मृतदेहांनाही वेटिंगवर ठेवावं लागत आहे.

कारण रुग्णालयातील शवगृहात मृतदेह ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. मृतदेह हाताळणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना पीपीइ किट मिळत नसल्यामुळे अनेक कर्मचारी अशा मृतदेहांच्या संपर्कात येत आहेत.

त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच मुंबई महापालिकेने केईएम रुग्णालयातील या शवांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अशी मागणी मजदूर युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.

मात्र यावर हॉस्पिटल प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकली नाही. पण कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर पडत असेलेल्या प्रचंड ताणामुळे या गोष्टींना विलंब लागत असल्याचं बोललं जात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24