अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :शाहजहांपूर जिल्ह्यातील निगोही पोलीस स्टेशन परिसरातील सहतपुर गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेचे तिच्या चुलत भावाबरोबरच प्रेमसंबंध जुळले. व त्यातून अडसर होणाऱ्या पतीचा गळा आवळून खून केला.
पोलिसांनी मृताच्या भावाच्या वतीने त्याचा मेहुण्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. राजवीर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
तो 26 वर्षांचा होता. चार वर्षांपूर्वी राजवीरचे शहरातील कोतवाली चौक परिसरातील अब्दुल्लागंज मोहल्ला इथल्या अंजलीशी लग्न झालं होतं.
राजवीर हा पत्नी अंजली आणि तिचा चुलतभाऊ बबलू यांच्यासमवेत निवारी खेड्यातील रहिवासी होता. कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली आणि तिचा भाऊ बबलू यांच्यात प्रेमसंबंध होते.
भाऊ राजवीरलाही याबाबत शंका होती. यावर त्याने अंजलीला समजही दिली होती. या प्रेमसंबंधाच्या मधे येणाऱ्या राजवीरचा काटा काढण्याचं ठरवलं. त्याला घरात एकटं गाठून त्याचा गळा आवळून ठार केलं.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews