अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- नगर शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी महिला रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेवगाव घाटात हत्या करण्यात आली आहे. केवळ वाहनाला कट मारला म्हणून अज्ञात व्यक्तींना त्यांची गाडी आडवून त्यांच्यावर धारधार हत्याराने वार केले.
यात त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टोल नाक्यावरील तरूणांना सॅन्ट्रोमधील महिलेने दिलेल्या माहीतीनुसार त्यांच्या गाडीला दुसरी गाडी घासल्यामुळे वाद झाला व त्या वादातून हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या हल्ल्यामागे दुसरेच कारण असल्याची चर्चा सुरू झाली असून पोलिस त्याचा शोध धेत आहेत. खरंतर, रेखा जरे यांचे सामाजिक वलय चांगले होते.
तर त्या स्वत: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा होत्या, त्याच बरोबर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांची हत्या म्हणजे एक राजकीय हेतू तर नसावी ना? अशी देखील उलट सुलट चर्चा सुरू आहे.
जरे यांची राजकीय व सामाजिक कार्यकीर्द चांगली राहिली आहे. त्यामुळे, त्या नेहमी चर्चेत होत्या. एकंदर या सर्व प्रकारांची शहनिशा आता पोलीस करतीलच,
मात्र अशा पद्धतीने एक धडाडीच्या महिलेचा अचानक खून होणे ही फार मोठी शोकांतीका आहे. हा खून का व कोणी केला याचे कारण येणार्या 24 तासात शोधणे मोठे आव्हान असणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved