महाराष्ट्र

माझा भ्रष्टाचार काढून दाखवा; रावसाहेब दानवे यांचं ओपन चॅलेंज

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- जपचे नेते किरीट सोमय्यांनी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर ईडीने त्यांच्यावर कारवाई करत खोतकरांच्या घरावर छापे टाकले.

या प्रकरणावरुन आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचा जुना वाद पुन्हा ताजा झाला आहे. हा वाद पुन्हा उफाळल्याचे स्पष्ट दिसत आहे.

शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. रामनगर साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी गैरकारभार झाल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

त्यानंतर या सर्व प्रकरणात किरीट सोमय्या यांचा बोलवता धनी रावसाहेब दानवे असल्याचे माध्यमांशी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले होते.

याबाबत आज रावसाहेब दानवे यांनी जालना शहरातील विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात खुलासा केला आहे. कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवावा, असं ओपन चॅलेंज भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना दिले आहे.

‘मी गरीब माणूस आहे, माझ्या नावाने बोंबलून काही फायदा नाही. ज्या गावात मतदान बुथ नव्हते, त्या गावचा मी आज केंद्रात मंत्री आहे, असंही दानवे म्हणाले आहेत.

मी कोणावर कशाचाही आरोप केलेला नाही, माझ्या अंगाला कुठलाही भ्रष्टाचार चिटकलेला नाही आणि असेल तर कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवावा’, असे खुले आव्हानच दानवेंनी दिले आहे.

Ahmednagarlive24 Office