अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्याचे आमदार माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या चर्चेबाबत माहिती देत पूर्णविराम दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले ”मतदारसंघाचा विकास गेली पाच वर्षे खोळंबला होता.आमदार नसतानाही लोकांच्या कामात व्यस्त असल्याने स्वत:कडे दुर्लक्ष झाल्याने आजारी पडलो.
मात्र, त्यातून विरोधकांनी अफवांचे पीक उभे केले.परंतु काळजी करू नका, मी पूर्ण ठणठणीत आहे. थांबलेला विकास पुन्हा एकदा जोमात सुरू करण्यासाठी सज्ज झालो आहे”
पत्रकारांशी बोलताना पाचपुते म्हणाले, “”काही काळ आजारी होतो, त्यात विधानसभा निवडणूक लागली. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला; मात्र तो पाळणे शक्य नव्हते. त्यामुळे आजार वाढला.
विधानसभा जिंकल्यानंतरही मतदारसंघातील लोकांशी नेहमीप्रमाणे चर्चा करता आली नाही. मात्र, आपल्या आजारपणाचे काही लोकांनी भांडवल केले.
गंभीर आजारी असल्याचे सांगून, वास्तवापासून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला होता.”
पाचपुते म्हणाले, “”विधानसभेत आमदारांमध्ये पहिली शपथ आपली झाल्याने जबाबदारीची जाणीव आहे. सध्या भाजपचे सरकार नसले, तरी आपल्याला काळजी नाही.
मतदारसंघाचा विकास कसा साधायचा, याचा अनुभव आहे. गेली पाच वर्षे सगळा विकास थांबल्याने आता जोमाने कामाला लागलो आहे.