अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार पाच नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले.
यामध्ये पंचायत समितीच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.
आजारी नातेवाईकाला भेटायला गेलेल्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. घारगाव येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या घरातील एका व्यक्तीलाही लागण झाली.
गार येथे रुग्णाच्या घरातील दोन जण पॉझिटिव्ह निघाले. यामध्ये ५ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. अजनुज येथे कोरोनाने शिरकाव केला. तेथे एक पॉझिटिव्ह व्यक्ती सापडली. तालुक्यात एकूण ४२ जणांना लागण झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com