श्रीरामपूर शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर :- जनतेच्या हिताचा विचार करून विकासकामे करत असून शहराचा कायापालट करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी सांगितले.

प्रभाग १६ मधील आजी-आजोबा विरंगुळा केंद्राचे उद्घाटन करताना आदिक बोलत होत्या. या वेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य नगरसेविका स्नेहल खोरे, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, उमेश अनकईकर, अर्जुनराव भांड आदी उपस्थित होते.

नगराध्यक्ष आदिक म्हणाल्या, शहरातील सर्व प्रभागांचा विकास करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रभाग १६ मधील ज्येष्ठ नागरिकांना निवांत क्षण मिळावेत,

म्हणून आजी-आजोबा विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आले असून हा छोटेखानी बगीचा नक्कीच परिसरातील ज्येष्ठांसाठी उपयुक्त ठरेल, अशी खात्री आदिकांनी व्यक्त केली.

आपल्या प्रास्ताविकात नगरसेविका खोरे यांनी थत्ते मैदानात लाल मातीचा ट्रॅक व सुशोभीकरणाचे काम नगराध्यक्ष आदिक यांच्या नेतृत्वाखाली लवकरच सुरू करणार असल्याचे सांगत

थत्ते मैदानासह प्रभागातील उर्वरित रस्ते, गटारींची कामे हाती घेणार असून आगामी अडीच वर्षांत शहरातील सर्वात प्रगतिशील प्रभाग म्हणून आपला प्रभाग असेल, असा विश्वास व्यक्त केला.

अहमदनगर लाईव्ह 24