जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर | गोंडेगाव येथील नवनाथ बन्सी म्हसे यांचा जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बन्सी म्हसे हे आपल्या कुटुंबासह झोपले असताना दरवाजा उघडून लाकडी दांड्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांचा मुलगा नवनाथलाही जबर मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

त्यांचा भावबंधाशी शेतीच्या वाद असून तो सध्या न्यायालयात आहे. याप्रकरणी बन्सी म्हसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून

मच्छिंद्र म्हसे, संतोष मच्छिंद्र म्हसे, ज्ञानेश्वर मच्छिंद्र म्हसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून मच्छिंद्र म्हसे याला अटक करण्यात आली आहे. 

अहमदनगर लाईव्ह 24