अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. जानेवारी 2021 पासून ही वाढ करण्यात आली आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.. सध्या कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 28 टक्के होईल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात यापू्र्वी जुलै 2020 मध्ये 3 टक्के वाढ करण्यात आली होती. तर जानेवारी 2020 मध्ये 4 टक्के वाढ करण्यात आली होती.
आता जानेवारी 2021 मध्ये देय असलेली 4 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण वाढ 11 टक्के होणार आहे. दरम्यान, सरकारने सध्या महागाई भत्त्यातील वाढ गोठवलेली आहे. त्यामुळे वाढीव महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. सरकारने महागाई भत्त्यात केलेल्या वाढीचा फायदा केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.
त्याचबरोबर 60 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे. विविध राज्यांच्या कर्मचाऱ्यांनाही सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.