दूध संघवालेच सत्तेत भागीदार असल्याने दुधाला भाव नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  दूध उत्पादक ज्या दूध संघांना दूध घालतात, त्यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे गाईच्या दुधाला २५ रुपये मिळाला पाहिजे. हा दर न देणाऱ्या दूध संघांवर सरकारकडून कारवाई व्हावी. पण तसे होताना दिसत नाही.

फडणवीस सरकारने जाहीर केलेले दुधाचे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. फडणवीस सरकारला दूध संघ चालवाऱ्या राज्यकर्त्यांचा बाहेरून पाठिंबा होता.

आता तर दूध संघवालेच सत्तेत भागीदार आहेत, त्यामुळे दुधाला सरकारी भाव मिळत नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी राज्य सरकारवर केली.

दूध दरवाढीच्या आंदोलनासंदर्भात आपली भूमिका व्यक्त करताना ते बोलत होते. दुधाला शासनाच्या जीआर प्रमाणे भाव मिळाला तरी हरकत नाही.

आमची तीच भूमिका आहे. दूध खरेदी करणारे एवढा सुद्धा भाव देत नाही. यावर नियंत्रण ठेवणारे राज्य सरकारसुद्धा त्यांच्यावर कारवाई करीत नाही.

शेतकऱ्यांच्या दुधाला, कापसाला, उसाला, कांद्याला भाव न देता लुबाडण्याचे काम सध्या चालू आहे. सरकारने जीआरची अंमलबजावणी करून किमान २५ रुपये दुधाला भाव द्यावा, असेही ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24