महाराष्ट्र

आतापर्यंत राज्यात इतके बांगलादेशी घुसखोर सापडले : राज्यात बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा गंभीर

Published by
Sushant Kulkarni

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : सध्या राज्यात विविध भागात होत असलेला बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा गंभीर झाला आहे.आतापर्यंत राज्यात ६५० पेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोर सापडले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे,अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवारी दिली.योग्य उपाययोजना केल्याशिवाय ही घुसखोरी थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​राज्यात गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश घुसखोरांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे.भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घुसखोरांचा आकडा २ लाख १४ हजार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांमध्ये बांगलादेशी घुसखोरीबाबत मतभिन्नता आहे का, घुसखोर नेमके किती आहेत, याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर कोलकातामार्गे भारतात प्रवेश करतात आणि नंतर संपूर्ण देशभर पसरतात.काही नेपाळमार्ग येतात.त्यामुळे घुसखोरी रोखण्याचे आव्हान सरकारपुढे आहे.परंतु राज्यस्तरावर मोहीम सुरू केली आहे.त्यासाठी रहिवासी दाखला अनिवार्य केला आहे.आधारकार्ड, पॅनकार्ड गृहीत न धरता जन्मदाखला बंधनकारक केला आहे.घुसखोर बांगलादेशी पकडणे पोलिसांना त्यामुळे सोपे जाईल,असे कदम म्हणाले.

Sushant Kulkarni