अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार व्हावे यासाठी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.
असेच कोविड सेंटर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुरु करण्याची मागणी केली जाऊ लागली होती. याबाबत तहसीलदारांनी सप्ष्टीकरण दिले आहे.
तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या हजारच्या पार होत असताना तातडीने कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. असे असले तरी त्यासाठी आरोग्य अधिकारीच उपलब्ध नाहीत.
त्यामुळे कोविड सेंटर सुरू करणे शक्य नसल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सांगितले. कांबळे म्हणाले, “”समशेरपूर, राजूर, शेंडी येथे अँटीजेन टेस्ट सुविधा असून, इतर ठिकाणी लवकरच ही सुविधा उपलब्ध करणार आहोत.
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत तालुक्यातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. तालुक्यात एकाच वेळी 50 कुटुंबांची तपासणी केली जाणार आहे. मास्क न वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
सध्या तालुक्यात पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत. अगस्ती कारखाना अजून 50 बेड्सची सोय करणार आहे. तसेच अकोले शहरात लवकरच निर्जंतुकीकरण करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved