अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- माझे राजकीय प्रस्थ सहन होत नसल्याने अनेकवेळा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला जेलमध्ये पाठविण्याचे काम काही विरोधकांनी केले.
परंतु मी कधी या गोष्टींना भीक घातली नाही. त्यामुळे यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळप्रसंगी जेलमध्ये देखील जाऊ.असे माजी आमदार शिवाजीराव कर्डिल म्हणाले. पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, पाथर्डी सारख्या दुष्काळी तालुक्यात स्व.दादा पाटील राजळे यांनी एका माळरानावर वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. आठशे टनाचा असलेला हा कारखाना आज पंचवीसशे टनाचे गाळप करत आहे. इतर अनेक कारखान्यांची बिकट अवस्था आहे.
मात्र वृद्धेश्वरचे सर्व संचालक, कामगार, सभासद, व्यवस्थापक यांच्या पादर्शकतेमुळे यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. या कारखान्याचे पालकत्व स्वीकारत यापुढील काळात या कारखान्याला जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कोविडमुळे गेल्या काही दिवसापासून साखरेच्या मागणीतही घट झाली असून, त्याचा परिणाम साखर विक्रीवर झाला आहे. त्यामुळे साखर कारखान्यात साखर शिल्लक राहत आहे. साखरेला बाजार भाव मिळत नसल्याने यापुढील काळात साखर कारखाने सुरू ठेवण्यासाठी इथेनॉल प्रकल्पासह वीज निर्मिती, बिस्लरी असे अनेक उद्योग हाती घेण्याची गरज आहे.
वृद्धेश्वर कारखान्यात उभारण्यात येणाऱ्या इथेनॉल प्रकल्पासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून निश्चितपणे सर्वतोपरी मदत केली जाईल. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांना जिल्हा सहकारी बँकेने कर्जपुरवठा करून हे कारखाने सुरू सुरळीत चालण्यासाठी मदतीचा हात दिला आहे.
जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू असल्याचे कर्डिले म्हणाले. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जि.प.सदस्य राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे, भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, माणिकराव खेडकर,
महिला तालुका अध्यक्षा काशीबाई गोल्हार, आशाताई गरड,नगराध्यक्ष डॉ.मृत्यूंजय गर्जे, उपाध्यक्ष नजीरभाई पठाण,माजी सभापती विष्णुपंत अकोलकर, सोमनाथ खेडकर, गोकुळ दौंड,बाळासाहेब गोल्हार, पं.स.सदस्य सुनील ओव्हळ, सुनील परदेशी, नगरसेवक नंदकुमार शेळके,
नामदेव लबडे, मंगलताई कोकाटे, दिनेश लव्हाट मधूकर काटे,बाबासाहेब किलबिले,ताराभाऊ लोंढे, व्हाईस चेअरमन रामकिसन काकडे, संचालक उद्धव वाघ, सुभाष ताठे, शरद अकोलकर यांच्यासह सर्व संचालक, कामगार, सभासद शेतकरी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved