अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील संगमनेर शहरातील धोकादायक इमारतींचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहे. आता याच पार्श्ववभूमीवर एक अत्यंत महत्वाची वाटमी समोर आली आहे.
शहरातील नवीन नगर रस्त्यावरील साथी भास्करराव दुर्वे (नाना) व्यापारी संकुलातील इमारत स्ट्रक्चरल ऑडिटनंतर धोकादायक ठरली.
त्यातील 34 गाळेधारकांसह आता शहरातील अन्य 73 इमारतींच्या 107 वापरकर्त्यांना वास्तू खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
यात नगरपरिषदेच्या, मेहतर समाजाचे वास्तव्य असलेल्या इंदिरा वसाहतीचा समावेश आहे. दरम्यान, आठ दिवसांत घरे खाली करण्याचा आदेश मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
फेब्रुवारीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या विविध इमारतींसह अन्य शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यातून व्यापारी संकुलासह 73 वास्तू धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
व्यापारी संकुलातील 34 गाळेधारकांसह वाल्मीक कॉलनीतील इंदिरा वसाहतीतील 36, मोमीनपुरा भागातील अंजुमन इमारतीतील 16, परदेशपुऱ्यातील तीन, पार्श्वनाथ गल्ली,
बाजारपेठ व सय्यदबाबा चौकातील दोन व मेन रोड, कोष्टी गल्ली, खंडोबा गल्ली, नारळ गल्ली, मोमीनपुरा, चंद्रशेखर चौक, सुतार गल्ली, शिकलकर गल्ली, तेली खुंट, साईनाथ चौक व साळीवाडा भागातील प्रत्येकी एक,
अशा 107 भोगवटादारांना गाळे अथवा घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्याने या सर्व भोगवटाधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved