अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात २९४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ३०७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनामुळे दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या आता ८३९ झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ५४ हजार ४७० झाली आहे तर आतापर्यंत ५१ हजार ८०७ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडून देण्यात आले आहे.
नगर शहर व जिल्ह्यात गुरूवारी सायंकाळी सहा वाजले पासून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ८२४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेमध्ये ३९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६५ आणि अँटीजेन चाचणीत १९० रुग्ण बाधित आढळले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved