अहमदनगर जिल्ह्यात आज एवढ्या शाळा उघडणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शाळा तसेच कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

जिल्ह्यात आजपासून शाळा उघडणार आहे मात्र, त्यासाठी शिक्षकांची कोव्हिड चाचणी, शाळा निर्जंतुकीकरण आणि विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमतीपत्र आवश्यक आहे.

ही तयारी पूर्ण करणार्‍या जिल्ह्यात जवळपास 350 असून या आजपासून सुरू होणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली.

दरम्यान, जिल्ह्यात 1 हजार 200 शाळा असून यापैकी ज्या शाळांमधील शिक्षकांची करोना चाचणी करताना संबंधित शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर इतर असे तीन जण उपस्थित असतील, अशा शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

तसेच येत्या 15 दिवसांत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण करून टप्प्याने शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24