औरंगाबाद : “दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न होतं, जर मराठवाड्याचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर संपूर्ण मराठवाडा रस्त्यावर उतरले”, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भाजपाच्यावतीनं माजी मंत्री पंकजा मुंडे आज, उपोषणाला बसल्या आहेत. सकाळी दहा वाजता औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडेंनी उपोषणाला सुरुवात केली.
या उपोषणाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसंच भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली.
आम्ही आज तुम्हाला जागरुक करायला आलो, मात्र खोडा टाकण्याचा आणि पाणी पळवण्याचा प्रयत्न केला, तर रस्त्यावर उतरु, असा इशारा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला.