अहमदनगर Live24 :- संकटाच्या काळात प्रत्येकाने माणुसकी जपण्याचे काम केले पाहिजे. नागरिकांना सांभाळण्याचे काम सरकारचे आहे. सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन प्रत्येक रेशनदुकानदाराने केले पाहिजे.
सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत प्रत्येक रेशनदाराने आपले दुकान उघडे ठेवले पाहिजे. प्रत्येकाने माणुसकीचे भान ठेवून वागावे. चुकीचे काम केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल.
प्रत्येक माणसाला शासनाने दिलेला अन्नधान्याचा साठा जनतेला द्या, अशा सूचना आ.संग्राम जगताप यांनी तहसीलदार उमेश पाटील, अन्नधान्य वितरण अधिकारी प्रदीप पवार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सैंदाणे यांना दिल्या.
आ. संग्राम जगताप यांनी नगर शहरातील रेशन दुकानांवरील अन्नधान्याचा साठा व्यवस्थित वितरीत करण्यात यावे, अशा सूचना रेशन दुकानदारांना देण्यात यावे, यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार उमेश पाटील, अन्नधान्य वितरण अधिकारी प्रदीप पवार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सैंदाणे आदी उपस्थित होते.
नगर शहरामध्ये हातावर पोट भरणार्यांची संख्या खूप मोठी आहे. यामध्ये छोटेमोठे व्यवसाय, फिटर, रिक्षा, चर्मकार, भाजीपाला, खाद्य पदार्थाच्या गाड्या, विडी कामगार आदी व्यावसायिकांवर कोरोना विषाणूचा संसर्गामुळे गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन असल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
काही दिवसांपासून आम्ही व विविध संस्थांनी पुढे येऊन मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु आता खरी गरज सरकारची आहे. यामध्ये परिस्थितीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलत आहेत.
तरी रेशन दुकान दारांनी प्रामाणिकपणे स्वस्त धान्याचे वाटप करावे, अशा सूचना देण्यात आल्या. येत्या 30 तारखेपर्यंत केसरी कुपन धारकांनाही अन्नधान्य पुरविण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी यावेळी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®