अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- राज्यात मागच्या वर्षीच्या गाळप हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक असताना यंदा उसाचे बंपर पीक उभे आहे. त्यामुळे राज्यात साखरेचा मोठा साठा निर्माण होणार असून कारखाने अडचणीत येणार आहेत.
यावर काही उपाययोजना करावी, असे साकडे साखर कारखानदारांनी महाराष्ट्र विकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना घातले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघामध्ये सोमवारी एक अनौपचारिक बैठक झाली.
त्यामध्ये साखर संघाकडून शरद पवार यांच्याकडे साखर कारखान्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. यासंदर्भात माहिती देताना संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे म्हणाले की, यंदा राज्यात ९०० लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे.
मागच्या हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक आहे. त्यात यंदाच्या १०० लाख टन साखरेची भर पडणार आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने पुढच्या हंगामात अधिक ऊस असणार आहे.
वाढत्या साखर साठ्याची मोठी समस्या राज्यात उद्भवली आहे. यावर मार्ग काढावा, अशी मागणी आम्ही शरद पवार यांच्याकडे केली. १५ आॅक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू होत आहे.
किमान १९५ कारखाने चालू हाेणे आवश्यक आहे. तसेच यंदा गाळप घटवण्याची गरज असून इथेनाॅल निर्मितीला अधिक चालना दिली पाहिजे, अशी विनंती पवार यांच्याकडे केल्याचे शेटे यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved