अपघातग्रस्त गाडीत सापडल ‘अस’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- होंडा सी. टी. कंपनीची कार गाडी क्रमांक (एमएच ०२ एपी ९२१६) यात विनापरवाना बेकायदेशिररित्या गावठी कट्टा आढळून आल्याने श्रीरामपूर पोलिसांनी टीप्या बेग व नितीन शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

होंडा सी. टी. कंपनीची कार गाडी नंबर (एमएच ०२ एपी ९२१६) या गाडीत विनापरवाना २५ हजाराचे एक स्टेनलेस स्टीलचा गावठी बनावटीचा पिस्तूल व दोन पिवळे जिवंत राऊड सापडल्या वरून टीप्या बेग व नितीन शर्मा यांच्याविरोधात शनिवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान श्रीरामपुर बेलापुर रस्त्यावर असणाऱ्या मोसंबी बागेजवळ अपघात झाला त्या वेळी दोन्ही गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या वेळी दोन्ही गाडी चालकांची आपापसात समेट झाली.

त्यामुळे कुणीही पोलीसांकडे तक्रार दाखल केली नाही. दरम्यान दोन्ही अपघातग्रस्त गाड्या दुरुस्तीसाठी आणत असतानाच एक गाडी गुन्हेगार टिप्या बेग याची असल्याची बातमी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीराट यांना समजली त्यांनी तातडीने ती गाडी ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

त्या वेळी बेलापुरातील नितीन शर्मा हा ती गाडी घेऊन येत असताना पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी गाडीत गावठी कट्टा आढळला त्यामुळे पोलिसांनी नितीन शर्मा याचेवर आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली.

हे भाजपाचे कार्यकर्ते सुनील मुथा यांना समजताच त्यांनी ग्रामस्थासह बेलापूर पोलीस स्टेशनला धाव घेतली. शर्मा हा केवळ अपघातग्रस्त गाडी आणत होता. त्यामुळे त्याचेवर खोटा गुन्हा दाखल करू नका नाही, तर गाव बंद ठेवू रस्ता रोको करू असा ईशारा देण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24