अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : जीपच्या सीटखाली तलवारी ठेवून त्या विकण्यासाठी निघालेल्या चौघांपैकी दोघांना पारनेर पोलिसांनी नगर-कल्याण महामार्गावर धोत्रे टोलनाक्यावर रंगेहात पकडले. अन्य दोघेजण पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले.
शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरून एम एच १६ बी एच ५९८० या जीपमधून अक्षय संजय पोपळे (२७), नजीमुददीन बाबुलाल शेख (४१), सोमनाथ सुरेश पठारे व राजेश रमेश फाळके (सर्व म्हसे, ता. श्रीगोंदे) हे तलवारी विकण्यासाठी निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
ढोकी टोलनाक्यावर हे वाहन पोलिसांनी थांबवले. पोलिसांची चाहूल लागताच चौघेही पसार होण्याच्या तयारीत असताना पोपळे व शेख यांना पोलिसांनी शिताफीने पकडले.
पठारे व फाळके पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी दोन तलवारी जप्त करत संचारबंदी आदेशाचे उल्लंघ करून बेकायदा प्राणघातक हत्यारे जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews