अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
काल अहमदनगर तालुक्यातील डोंगरगण, पिंपळगाव माळवी येथे अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे पिंपळगाव माळवी येथील तब्बल सातशे एकरांवर पसरलेला पिंपळगाव तलाव तब्बल दहा वर्षांनंतर तुडुंब भरला .
त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तलाव कोरडा झाल्यानंतर यातील माती शेतकऱ्यांनी काढल्यामुळे तलावाची खोली वाढून त्याची क्षमता वाढली आहे .
तलाव परिसरात अनेक आदिवासी कुटुंब रहात असून मासेमारी हा त्यांच्या व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील मिटला आहे .
तसेच या तलावातिल पाण्यावर पिंपळगाव, डोंगरगण मांजरसुंबा, जेऊर या गावाचा पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्यामुळे त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
* ‘ह्या’ तलावाचा हा आहे इतिहास :- नगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर पिंपळगाव माळवी येथे महानगरपालिकेचा पाणीपुरवठा तलाव आहे .
१९२० साली ब्रिटिशांनी शहराला पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी हा तलाव बांधला.तब्बल १९९० सालापर्यंत शहराला या तलावातून पाणीपुरवठा सुरु होता .
मुळा धरणातून नवीन पाणीयोजना झाल्यानंतर या तलावातून पाणीपुरवठा बंद झाला व महानगरपालिकेचे तलावाकडे दुर्लक्ष झाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved