अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- मालट्रक घेऊन नगर- मनमाड रोडने जाणाऱ्या चालकाला विळद बायपास येथे तिघांनी लुटण्याची घटना घडली आहे. त्यांच्याकडून जवळपास १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे.
ट्रक चालक सोनु लक्ष्मणलाल धाकड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक महती अशी : सदर फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील मालट्रक घेऊन नगर- मनमाड रोडने चालले होते.
ते विळद बायपास येथे आल्यानंतर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी फिर्यादीच्या मालट्रकला दुचाकी अडवी लावली. आम्ही फायनान्सवाले आहोत अशी बतावणी करत तिघेही ट्रकमध्ये चढले व दोघांनी फिर्यादी यांचा गळा दाबून धरला.
तर एकाने फिर्यादी यांच्या खिशातील 11 हजार रूपये किंमतीचा मोबाईल, 1 हजार 200 रूपये रोख रक्कम, एटीएम कार्ड, पॅन कार्ड काढून घेतले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved