अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीने १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान आरोग्य शिबिरे, वैचारिक प्रबोधन, रॅली, रक्तदान शिबिर, नूतन शाखा व विविध उपक्रमांसह काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचे आयोजन केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या अतिथिगृहावर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, बाजीराव खेमनर, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, मधुकरराव नवले, सुरेश थोरात, दादापाटील वाकचौरे, इंद्रभान थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, हिरालाल पगडाल,
डॉ. एकनाथ गोंदकर, तुषार पोटेे, नितीन शिंदे, सुनील साळुंखे, प्रतापराव ओहोळ, अंकुशराव कानडे, अभिजित लुणिया, रवींद्र साबळे, अरिफ तांबोळी यांच्यासह पाच जिल्ह्यांतील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषद गट व गणनिहाय आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, वक्तृत्व स्पर्धा, नोकरी मेळावा,
मॅरेथॉन स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, गाव तेथे शाखा आदींसह विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले दूरदृष्टीचे निर्णय, मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची विचारधारा व लोकोपयोगी कामे सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.