भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाला अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी नुकतंच बँकेचे माजी संचालक रजनीत सिंह याला अटक केली आहे. रजनीत सिंह हा भाजपच्या माजी आमदार सरदार तारा सिंह यांचा मुलगा आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने रजनीत सिंहला अटक केली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नववी अटक आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत ईओडब्ल्यू बँकेचे माजी संचालक वरयाम सिंह, व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि एचडीआयएलचे प्रवर्तक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चौकशीनंतर माजी संचालक सुरजीत सिंह अरोडा, एचडीआयएल समूहाचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन, बँकचे माजी अध्यक्ष वरयाम सिंह आणि माजी संचालक जॉय थॉमस यांना अटक केली होती.

त्याशिवाय ऑडिटर जयेश संघानी, केतन लकडावाला यांनाही अटक केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24