मुंबई :- शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षाच्या महा-शिव-आघाडीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून हिरावा कंदील मिळाल्याचे वृत्त आहे.कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाशिवआघाडीला मंजुरी दिली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
सोनिया गांधीं यांच्याकडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीला मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता केवळ सत्तेचं वाटप, मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाच्या खात्यांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर राज्यात सत्तास्थापन होईल.
मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते या बैठकीस उपस्थित होते. सोनिया यांनी कौल देताच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीद्वारे राज्यात सत्तास्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज सकाळीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते की, काँग्रेस-राष्ट्रवादीची आज होणारी बैठक ही शेवटची असेल. या बैठकीनंतर राज्यातील सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल, असा अंदाजही व्यक्त केला होता.