डिसेंबर महिन्यात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-भारत निवडणूक आयोगाने ०१ जानेवारी, २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमांतर्गत दिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून दिनांक १५ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.

अधिकाधिक नवमतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करावे यासाठी डिसेंबर महिन्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. ही विशेष मोहिम दिनांक ०५ व ०६ डिसेंबर आणि दिनांक १२ व १३ डिसेंबर, २०२० रोजी राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत जिल्हयातील सर्व राजकीय पक्षांनीही सहभागी होऊन या मोहिमेसाठी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बूथ लेवल एजंट) यांची नेमणूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24