यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी खास चार टिप्स

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmednagar News

UPSC मध्ये टॉप करणे व चांगली पोस्ट काढणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यातून प्रत्येक जण आपल्या पद्धतीने अभ्यास व सराव करत असतो. या ठिकाणी आपण काही टिप्स जाणून घेऊयात की ज्याद्वारे तुम्हाला परीक्षेत यश संपादन करण्यास मदत होईल.

स्वतःला तयार करा
घरबसल्या यूपीएससीची तयारी कशी करायची हे समजून घेण्यापूर्वी आपण स्वत:ला UPSC च्या प्रवासासाठी तयार केले पाहिजे. तयारी सुरू करण्यापूर्वी परीक्षेची मानसिक आणि शारीरिक तयारी केली पाहिजे व त्यानुसार ध्येय ठरवा आणि वेळ प्रभावीपणे ठरवा.

एक टाइम टेबल बनवा
आयएएस अधिकारी होण्यासाठी पद्धतशीर दैनंदिन दिनचर्या असलेल्या अधिकाऱ्यासारखे असणे आवश्यक आहे. आपण आपल्या तयारीपूर्वी एक वेळापत्रक सेट केले पाहिजे आणि त्यास फॉलो केले पाहिजे. वेळापत्रक तयार केल्याने आपली तयारी सोपी होईल आणि ती अधिक सुव्यवस्थित होईल. एक विशिष्ट डेडलाईनमुळे दिल्याने तुम्ही चांगले काम कराल आणि अभ्यासक्रम वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल.

UPSC अभ्यासक्रम जाणून घ्या
अभ्यासक्रम हा कोणत्याही परीक्षेचा आत्मा असल्याने हा अभ्यासक्रम जाणून घेऊन तयारी सुरु करणे कधीही चांगले. UPSC ने नागरी सेवा प्राथमिक आणि मुख्य परीक्षेसाठी विशिष्ट पद्धतीने अभ्यासक्रम तयार केला असून या रीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे आणि त्यानुसार अभ्यास केला पाहिजे.

वर्तमानपत्र वाचन/चालू घडामोडी
आयएएस परीक्षेत वृत्तपत्र ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असून जर तुम्ही आयएएस परीक्षेसाठी रोजची वर्तमानपत्र वाचले पाहिजे. दैनंदिन बातम्या पाहिल्या पाहिजेत. नागरी सेवा परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चालू घडामोडींशी संबंधित असतात. त्यामुळे आपल्या दैनंदिन वर्तमानपत्रातील संबंधित बातम्या वाचणे फायदेशीर असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News