महाराष्ट्र

आयआरसीटीसीच्या वेबसाईटद्वारे एसटी बसचे तिकीट आरक्षित करता येणार

Published by
Ahmednagarlive24 Office

प्रवाशांना आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन) च्या वेबसाईटद्वारे आता एसटी महामंडळाच्या बसचे तिकीट आरक्षित करता येणार आहे. एसटी महामंडळाची ऑनलाइन बस बुकिंग सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नुकताच आयआरसीटीसी – आणि एसटी महामंडळ यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा आयआरसीटीसीद्वारे करण्यात आली आहे.

ऑनलाइन आणि डिजिटल कार्यपद्धती सर्वत्र सुरू असताना एसटी महामंडळाची ऑनलाइन तिकीट सुविधा ही अधिक मजबूत करण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. याच पार्श्वभूमीवर आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा बुधवार,

१३ सप्टेंबर रोजी आयआरसीटीसीद्वारे करण्यात आली आहे. प्रवाशांना https://www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर एसटी बसचे तिकीट बुकिंग करता येणार आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयआरसीटीसीच्या सीएमडी आणि परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांच्यात सामंजस्य करार झाला होता.

आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची व्यवस्थ एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीने होणार आहे. या एकत्रिकरणामुळे प्रवाशांना सुरळीत प्रवासाची निश्चिती मिळेल. – सीमा कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आयआरसीटीसी

Ahmednagarlive24 Office