एसटी महामंडळाला बसणार ५० लाख रुपयांचा फटका !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-कार्तिकी एकादशी वारीसाठी दरवर्षी राज्यात व परराज्यातून अनेक भक्त विठ्ठलाचे दर्शन घेण्याकरिता पंढरीत दाखल होतात.

या माध्यमाने एसटी महामंडळाला दिवसाला १६ ते १७ लाखांचे उत्पन्न मिळते. परंतु, यंदा प्रशासनाने दिलेल्या निर्णयानुसार कार्तिकी वारी होणार नाही.

त्यामुळे एसटी महामंडळाला सुमारे ५० लाख रुपयांचा फटका बसणार आहे. वारीविना पंढरपूर हे समीकरण महाराष्ट्राला रुचणारे नाही.

मात्र, कोरोना संसर्गाची शक्यता पाहता शासनाने यंदाची कार्तिकी वारी साधेपणाने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. याचा फटका वारी करणाऱ्या भक्तांपासून ते पंढरीतील यात्री उतरवणारे,

माळा, कुंकू, धूप, उदबत्ती, फूल, प्रसाद विक्रेते या सर्वांनाच बसणार आहे. सर्वात मोठा फटका हा सोलापूर एसटी विभागाला बसणार आहे.

वारी नसतानाच्या काळात सोलापूर व पंढरपूर येथून येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यातून दिवसाला ८ ते ९ लाख रुपये मिळतात. वारी काळात हे उत्पन्न दुप्पट, तिप्पट होते.

याशिवाय राज्याच्या इतर शहरातून आणि इतर राज्यांतून येणाऱ्या भक्तांकडून ग्रुप बुकिंग मोठ्या प्रमाणावर होते. त्यातून एसटीला ३० ते ४० लाखाहून अधिक उत्पन्न मिळते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24