स्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- राज्‍य व केंद्र शासन शहरातील विविध योजनेसाठी मोठया प्रमाणात निधी प्रस्‍तावित करित असतात. परंतु अधिकारी या कामांमध्‍ये हलगर्जीपणा करून एकमेकांची कामे एकमेकांवर ढकलण्‍याचे प्रकार दिसून येतात.

त्‍यामुळे शहरातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागण्‍यास उशीर होतो. मा.शासनाच्‍या योजनेमध्‍ये दिरंगाई करू नये मा.केंद्र शासनाने भुयारी गटर योजनेला निधी दिला त्‍या योजनेच्‍या कामाची मुदत संपूनही फक्‍त 26 टक्‍के काम मार्गी लागले. हे काम 70 ते 80 टक्‍के झाले असते तर केडगांव व सावेडी उपनगर भुयारी गटर योजनेला मोठा निधी मिळाला असता.

परंतु हे काम संथ गतीने सुरू आहे. अधिकारी यांनी या कामाला गती दयावी. शहरातील रस्‍त्‍यावरील खड्डयाचा प्रश्‍न गंभीर स्‍वरूपात आहे. नागरिक नगरसेवकांना दोषी धरतात. येत्‍या सोमवार पासून पाऊस न आल्‍यास शहरासह उपनगरातील खड्डे बुजविण्‍याच्‍या कामाला सुरूवात करणार असल्‍याचे सांगितले.

शहरात विविध रस्‍त्‍याची कामे मंजूर असून भुयारी गटर योजनेच्‍या कामामुळे प्रलंबित आहे. आपण सर्वांनी मिळून शहर विकासासाठी सहकार्य करावे असे प्रतिपादन स्‍थायी समितीचे सभापती मा. श्री मनोज कोतकर यांनी केले. शहरातील विविध प्रलंबित प्रश्‍ना संदर्भात अधिकारी ,

इंजिनिअर व विभाग प्रमुख यांच्‍या बैठकीत बोलताना स्‍थायी समितीचे सभापती मा.श्री.मनोज कोतकर, उपायुक्‍त डॉ.श्री.प्रदिप पठारे, श्री.दिनेश सिनारे , श्री.संतोष लांडगे, सहाय्यक आयुक्‍त श्री.सचिन राऊत, शहर अभियंता श्री.सुरेश इथापे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री.आर.जी.सातपुते,

विद्युत विभाग प्रमुख श्री.आर.जी.मेहेत्रे, घनकचरा विभाग प्रमुख डॉ.नरसिंह पैठणकर, आरोग्‍याधिकारी डॉ.अनिल बोरगे, प्रसिध्‍दी विभाग प्रमुख श्री.दिगंबर कोंडा, अभियंता श्री.श्रीकांत निंबाळकर, श्री.मनोज पारखे, श्री.वैभव जोशी, श्री.गणेश गाडळकर, अग्निशमन विभाग प्रमुख श्री.‍शंकर मिसाळ , श्री.गबाजी झिने प्रभाग अधिकारी श्री.नाना गोसावी,

सावेडी विभाग प्रमुख श्री.जितेंद्र सारसर, केडगांव विभाग प्रमुख श्री.सुखदेव गुंड, व अधिकारी वर्ग उपस्थित होते. मा.श्री.मनोज कोतकर पुढे म्‍हणाले की, मुळा धरण ते वसंत टेकडी पर्यतच्‍या अमृत पाणी योजनेच्‍या कामाला अजून गती दिली जाणार आहे.हे काम पूर्ण झाल्‍यानंतर नगर शहराला फेज-2 पाणी योजने अंतर्गत पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे.

हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करावे शहरातील विद्युत प्रश्‍नही येत्‍या दोन ते तीन महिन्‍यात सुटणार आहे.. शहरातील कोरोनाचे रूग्‍ण कमी करण्‍यासाठी सर्वांच्‍या सहकार्याची आवश्‍यकता आहे. मनपाच्‍या माध्‍यमातून विविध उपाय योजना यापुढील काळात हाती घेतल्‍या जातील.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24