अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील गरीब आणि वंचित समूहातील लोकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
आपल्या सामाजिक दायित्व धोरणानुसार दरवर्षी वंचितांसाठी काम करणाऱ्या संस्थांना बँक कर्तव्यभावनेतून सहयोग देते ,असे प्रतिपादन बँकेचे क्षेत्रीय अधिकारी महेंद्र मोहिते यांनी केले.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहमदनगर औद्योगिक वसाहतींमधील विभागीय कार्यालयाने अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील ४५०० वंचित बालकांची कोविड ने झाकोळलेली दिवाळी उजळली.
वंचित मुलांसाठीच्या दीपदान उपक्रमात स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रत्येक बालकासाठी खाऊ, अंगाचा आणि कपड्याचा साबण, सुगंधी तेल बाटली ,
अत्तराची कुपी ,टूथ ब्रश आणि पेस्ट, कंगवा, नेलकटर इत्यादी चा समावेश असलेला आनंदठेवा सहयोग रूपाने दिला. अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध अनाथ मुलांच्या संस्था,
झोपडपट्टीतील बालके , देहव्यापार मधील महिला , दिव्यांग बालके आणि परिवार , यांना प्रातिनिधिक स्वरूपात आनंद ठेव्याचे वाटप करण्यात आले.
स्नेहालय संस्थेतील आयोजण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री महेंद्र मोहिते आणि मनोज शहा हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळेस स्नेहालय संस्थेचे मानद सचिव राजीव गुजर, अध्यक्ष संजय गुगळे ,अनिल गावडे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख,प्रवीण मुत्याल, युवनिर्माण चे समन्वयक विशाल अहिरे
, श्रीमती जया जोगदंड, अजित कुलकर्णी, फिरोज तांबटकर, जयकुमार मुनोत, यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योगदानाची कृतज्ञता व्यक्त केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved