राज्य सरकार करोनाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना राबवण्यात अपयशी : माजी खासदार दिलीप गांधी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोनाची आलेल्या राष्ट्रीय आपत्तीत केंद्र सरकारने प्रभावी उपाय योजनानां बरोबरच मोठ्या प्रमाणात पॅकेज देऊन जनतेला मोठा दिलासा दिला आहे. मात्र राज्यातील आघाडी सरकारला केंद्र सरकारने दिलेल्या योजनांची अमलबजावणी करण्यात अपयशी ठरत आहे.

म्हणूनच करोनाच्या बाबतीती आपला महाराष्ट्र आज देशात आघाडीवर आहे. सर्व प्रसाकीय यंत्रणा आज अहोरात्र राबत आहे. मात्र सरकारने त्यांना ज्या पद्धतीने सुविधा, सहकार्य देणे आवश्यक आहे त्या सुविधा दिल्या जात नाहीये.

नगर मधील करोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यावर सरकारने दिरंगाईने येथे टेस्टींग लॅब उघडली आहे. केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेले रेशन वरील धान्य वाटपही सरकारला व्यवस्थित वाटप करता आले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात राबवलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे व वेळेवर घेतलेल्या निर्याणां मुळे जगाच्या मनाने करोणाबाबतीत भारत चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इतर मोठे राष्ट्रही मार्गदर्शन घेत आहे.

मात्र राज्य सरकार मोदींना दोष देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भरपूर बोलत आहेत. मात्र प्रत्यक्ष उपाययोजनांची कृती करण्यास सपशेल अपयशी ठरत आहेत.

महाराष्ट्र आज इतर बाबतीत देशात आघाडीवर आहे हा अभिमान आहे. मात्र करोना बाबतीत सर्वात आघाडीवर असणे हा काही अभिमान नाही . म्हणून भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री व आघाडी सरकारचा निषेध करत आहे.

राज्यातील करोनाचे संकट दूर करण्यासाठी आता तरी राज्य सरकाने केंद्र सरकारच्या उपयायोजनांची त्वरित अंमलबजावणी करावी, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले.

राज्य सरकार करोनाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना राबवण्यात अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ शहर भाजपाच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी आपल्या निवास्थानी ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या.

यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी दिलीप गांधी बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, सौ.सरोज गांधी, मिलिंद भालसिंग, कैलास झिंजुर्डे, मल्हारी दराडे,सोशल मिडिया प्रसिद्धी प्रमुख रोशन गांधी आदि उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24