महाराष्ट्र

राज्य सेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  राज्यात अचानक कोरोना रुग्ण संख्या जास्त वाढल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी दिनांक 2 जानेवारी 2022 घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

याबाबत राज्य लोकसेवा आयोगाकडून एक प्रसिद्धपत्रक आले असून आता ही परीक्षा दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

तसेच परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी देखील काही महत्त्वपूर्ण सूचना या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आल्या असून, सोबत परीक्षेचे प्रवेशपत्र देखील जाहीर करण्यात आले आहेत महाराष्ट्रा लोकसेवा आयोगामार्फत 2 जानेवारी 2022 रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती.

मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा आता रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

रविवारी दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित परीक्षेकरीता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश प्रमाणपत्रांमध्ये नमूद परीक्षा उपकेंद्रावर संबंधित उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबत शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांना प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली होती.

त्यानुसार अर्ज सादर केलेल्या संबंधित उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवरील उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे.

परीक्षा कक्षेत प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणत्रत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

त्याच्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणारर नाही. प्रवेश पत्र मिळण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्यास तातडीने आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर संपर्क साधावा.

Ahmednagarlive24 Office