अहमदनगर महापालिकेच्या ‘स्वीकृत’चा घोडेबाजार थांबवा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- अहमदनगरला महानगरपालीकेचे स्वीकृत नगवसेवक पद हे कायद्याने ठरविलेल्या नियमानुसारच देण्यात यावे.

तसेच या पदाच्या निवडीतून होणारा ‘घोडेबाजार’ थांबविण्यात यावा. त्याविषयी मीं तक्रार जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात महानगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदी संबंधितांची गुरूवार दि. 1 ऑक्टोबर 2020 रोजी निवड प्रक्रिया होणार आहे.

दरम्यान, जानेवारी महिन्यामध्ये या निवडी मनपाचे तत्कालिन प्रभारी आयुक्‍त असलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व स्वीकृत नगरसेवकांनी केलेल्या अर्जाची काटेकोरपणे तपासणी केली होती. त्यावेळी अर्ज दिलेल्या स्वीकृत नगरसेवकांनी सामाजिक संस्थेचे नावे दिली होती.

त्यात अनेक त्रुटी निघाल्या होत्या. त्यामुळे त्या सर्वांना प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी अपात्र ठरवले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी राज्य निवडणुक आयोगाने स्वीकृत नगरसेवकपदासाठी काही नियमावली ठरवून दिलेली आहे.

त्या नियमावलीनुसार संभाव्य स्वीकृत नगरसेवकपदासाकठी उमेदवार मान्यता प्राप्त आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक असावा. त्याला किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. शिक्षण क्षेत्रातील निवृत्त प्राध्यापक , मुख्याध्यापक या पदांचा किमान पाच वर्षांचा अनुभव,

सनदी लेखापाल किंवा परिव्यय लेखापाल म्हणून पाच वर्षांचा अनुभव,पाच वर्षांचा इंजिनिअर या पदाचा अनुभव असावा. तसेच त्याच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापिठाची कायद्याची पदवी, विधी क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, वय तसेच या सर्वांचा अनुभव,

महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या समाज कल्याण कार्यालयामध्ये नोंदणीकृत संघटनेचा पदाधिकारी म्हणून पाच वर्षाचा अनुभव असलेली व्यक्तीच स्वीकृत नगरसेवक पदासाठी पात्र ठरते, असे नियमात लिहिलेले आहे. हे सर्व नियम धाव्यावर बसवून राजकीय पक्ष त्यांच्याजवळील समर्थक कार्यकर्त्यांनाच स्वीकृत नगरसेवक करतात.

स्वीकृत नगरसेवक पद हे निवडणूक आयोगाने ठरवलेल्या नियमात दिले नाहीतर आम्हाला आपल्या विरुद्ध न्यायालयात कायदेशीर दाद मागवावी लागेल. अहमदनगर शहरामध्ये स्वीकृत नगरसेवकपदी पात्र असलेले अनेक लोक आपल्या आजुबाजुला आढळून येतील.

त्यातील लोकांना वरील नियमानुसार त्यांचे सामाजिक काम पाहून त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्यात यावे आणि या निवड प्रक्रियेमध्ये होणारा मोठा ‘घोडेबाजार’ थांबविण्यात यावा.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24