विद्यार्थ्यांसाठी कॉलेज जीवनात विविध कागदपत्रांची अत्यंत गरज पडते. यामध्ये नॉन क्रिमिलेअर, जात प्रमाणपत्रासह अनेक दाखल्यांचा समावेश होतो. परंतु हे दाखले काढताना विद्यार्थ्यांकडून जास्त पैसे उकळण्याचे प्रकार घडतात.
आता राज्य सरकारने यात मोठा बदल केला असून या दाखल्यांसाठी अर्ज करण्यापासून ते दाखले प्राप्त करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन असून, रांग लावण्याचे किंवा वशिला लावण्याचे कोणतेही टेन्शन उरलेले नाही. दाखले देखील ३३.६० रुपयांत मिळतील.
काय आहे ऑनलाइन प्रक्रिया?
शासनाने आता ऑनलाइन दाखल्यांची प्रणाली सुरू केली आहे. त्याद्वारे कोणतेही प्रमाणपत्र केव्हाही काढता येते. त्यासाठी सेतू किंवा आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज करावा लागतो.
घरबसल्या ऑनलाइन काम
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचे काम घरूनही करता येते. अर्जदाराने स्वतःची अचूक माहिती अर्जात भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे, पासपोर्ट फोटो अपलोड करायचा असतो. अर्ज भरून झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात शुल्क भरायचे असते.
अर्जदारांच्या विविध दाखल्यांचे काम झटपट होण्यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी केवळ विहित शुल्क द्यावे लागते. ऑनलाइन प्रणालीमुळे वेळ वाचतो. या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे
किती दिवसांत मिळतो दाखला ?
दाखला – शुल्क – कालावधी
डोमिसाइल- ३३.६० – ३ दिवस
उत्पन्न – ३३.६० – ७ दिवस
जात प्रमाणपत्र – ३३.६० – २१ दिवस
नॉन क्रिमिलेअर – ३३.६० – २१ दिवस
आता तुम्हाला दाखल्यांसाठी रांगेत उभे राहण्याची किंवा वशिला लावण्याची गरज नाही. केवळ शासनाने ठरवून दिलेले विहित शुल्क ऑनलाइन भरावे लागणार असून दिलेल्या वेळेत तुम्हाला दाखले मिळतील.