अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- सर्वत्र कोरोनाचे सावट असताना परीक्षा घ्यायच्या कि नाही यावरून भरपूर राजकारण झाले. अखेर परीक्षांना संमती मिळाली व जिल्ह्यातील 25 केंद्रांवर नीट ची परीक्षा सुरक्षित पार पडली.
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर पार पडली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 9 हजार 170 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 90 टक्के विद्यार्थी परीक्षेला हजर होते.
मात्र करोनाचे सावट असल्याने 10 टक्के विद्यार्थी गैरहजर असल्याची माहिती नीटच्या जिल्हा समन्वयकांनी दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन नुसार ही परीक्षा संपन्न झाली.
दुपारी दोन ते सायंकाळी पाच यावेळेत ही परीक्षा पार पडली. केंद्रांच्या बाहेर त्या-त्या उपविभागीय कार्यालयांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते.
सर्व केंद्र सॅनिटायझर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना दुपारी अकरा ते दीड यावेळेत प्रवेश देण्यात आला. कोरोनाची वाढती संख्या पाहता योग्य खबरदारीचे उपाय म्हणून
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्व उपाययोजना करून प्रत्येक केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग पाळत विद्यार्थी परीक्षेसाठी बसविले होते. टप्प्याटप्प्याने ठराविक विद्यार्थ्यांना आत प्रवेश दिला जात होता.
थर्मल स्क्रिनिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जात होता. केंद्रावर दोन जणांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर ठेवण्यात आले होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved