अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : सध्या लॉक डाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजुरांनी स्थलांतर केले. ते त्यांच्या राज्यामध्ये निघून गेले. परंतु येथील उद्योगधंदे सुरळीत झाले की,
परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात येतील तेव्हा त्यांची स्थलांतरित कायद्यांतर्गत नोंद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली होती.
राज ठाकरेंच्या या मागणीनंतर राज्य सरकार परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत नवे धोरण आखण्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात संकट कोणतही मोठं संकट आलं की परप्रांतांमधून आलेले लोकं सर्वात आधी आपल्या राज्यात निघून जातील असं मी याआधी देखील सांगितलं होतं. कोरोनाच्या काळात देखील आता तेच घडताना दिसून येत आहे.
त्यामुळे यातून बोध घेऊन परप्रांतियांची एंट्री आणि एक्झिट यावर बंधनं आणायला हवीत. असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. दरम्यान , राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, राज्यात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या नोंदणीबाबत धोरण ठरविण्यासाठीच्या चर्चा सुरू आहे.
त्यामुळे यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरेंची आणखी एक मागणी पूर्ण करत ठाकरे सरकार आगामी काळात ऐतिहासिक निर्णय घेणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews