अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील जवान कैलास विठ्ठल ठुबे यांची पोस्टिंग सध्या मध्यप्रदेशमध्ये आहे.
सुट्टीसाठी ते गावी आले असता त्यांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये क्वॉरंटाईन व्हावे लागले. या काळात त्यांनी शाळेत विधायक कामे करत नवा आदर्श घालून दिला आहे.
त्यांनी वेळेचा सदुपयोग करत शाळेचा परिसर स्वच्छ केला. सध्या शाळा बंद असल्याने शाळेतील कचर्यासह वाळलेल्या झाडाची पाने पहिल्या दिवसांपासून साफ केली आहे.
त्यामुळे शाळेचे रुपडे पलटले आहे. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांनी जी झाडे लावली आहे. त्या झाडांची खुरपणी करून त्यांना खत पाणी घालून झाडे ऐन उन्हाळ्यात बहरवली आहेत.
यासह शाळेतील वर्ग खोल्या व संपूर्ण परिसर त्यांनी स्वच्छ केला आहे. शाळा परिसर स्वच्छ केल्याबद्दल त्यांचा कान्हूर पठार कोरोना समितीच्यावतीने सत्कारही करण्यात आला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews