संगमनेर :- बारावीमध्ये नापास झाल्याच्या नैराश्येतून एका विद्यार्थ्यांने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.
ही घटना आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमरास संगमनेर तालुक्यातील नांदुरी येथे घडली. सौरभ बाळासाहेब लांडगे (वय-१७ रा. नांदुरी दुमाला) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
राज्यात आज बारावीचा निकाल जाहिर झाला. नांदुरी येथील सौरभ लांडगे याने बारावीची परिक्षा दिली होती. बारावीत नापास झाल्याने सौरभला नैराश्य आले.
त्याने नांदुरी येथील सिताराम शेटे यांच्या शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच गावक-यांनी सौरभला बाहेर काढून घुलेवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.