मुंबई: राज्यातील साखर कारखान्यांना बगॅस आधारित सहवीजनिर्मितीसाठी महावितरण प्रति युनिट १.५० रुपये इतके अनुदान एक वर्षासाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली.
साखर आयुक्तांनी अटी व शर्तीसह अर्ज केलेल्या साखर कारखान्यांना प्रतियुनिट १.५० रुपये इतके अनुदान देण्याचा निर्णय विधानसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीर केला होता. यामध्ये ४८ साखर कारखान्यांनी सहकार आयुक्तांकडे अर्ज केले होते. यापैकी ४१ कारखान्यांना १.५० रुपये प्रति युनिट याप्रमाणे ११२ कोटी १० लाख इतके
अनुदान जाहीर झाले आहे. यात खासगी तसेच सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व पक्षांतील राजकीय नेत्यांच्या सहकारी तसेच खासगी कारखान्यांना प्रति युनिट १.५० रुपये इतके अमुदान दिले आहे.
विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे काही सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना अनुदान देता आले नव्हते. त्यामुळे ४१ कारखान्यांना वाटप झाले होते, तर ७ कारखान्यांपैकी दोन कारखान्यांना आताच वाटप केले आहे. यामध्ये सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, जयहिंद शुगर प्रा. लिमिटेड या कारखान्यांचा समावेश आहे.
अनुदानप्राप्त साखर कारखान्यांची नावे
रेणा सहकारी साखर कारखाना, पराग अॅग्रो फूड्स, क्रांती अग्रणी जी. डी. लाड, ट्वेंटीवन शुगर लिमिटेड, माळेगाव सहकारी कारखाना, श्रीपती शुगर लिमिटेड, रेणुका शुगर लिमिटेड, विघ्नहर सहकारी कारखाना, भीमाशंकर सहकारी कारखाना, भीमाशंकर सहकारी कारखाना (फेज-२), शरद सहकारी साखर कारखाना,
मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, छत्रपती शाहू कारखाना, खटाव माण तालुका सहकारी कारखाना, गंगाखेड (जी ७) शुगर लिमिटेड, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, डॉ. आंबेडकर साखर कारखाना, राजाराम बापू कारखाना, बारामती अॅग्रो, जरंडेश्वर
शुगर (फेज-२), जरंडेश्वर शुगर (फेज-१), दूधगंगा वेदगंगा सहकारी, अयान शुगर मल्टीट्रेड एलएलपी, श्रीदत्त इंडिया प्रा. लिमिटेड, लोकनेते मारुतराव घुले सहकारी कारखाना (फेज १), लोकनेते मारुतराव वधुले सहकारी कारखाना (फेज २), शिवाजीराव नागवडे सहकारी कारखाना (फेज १),
क्रांती शुगर अँड पॉवर लि., पांडुरंग सहकारी कारखाना, जवाहर सहकारी साखर (फेज १), जवाहर सहकारी साखर (फेज २), किसनवीर खंडाळा, मुळा सहकारी कारखाना, आष्टी शुगर लिमिटेड, मानस अॅग्रो इंड, दौड शुगर प्रा.लि. (फेज १), गोकुळ शुगर्स लिमिटेड, पियूष शुगर्स प्रा. लि.