अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जळगाव : शहरातील एका बिल्डरने अपार्टमेंटचे बांधकाम सुरू असलेल्या साइटवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेमुळे बिल्डर व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अनिल जगन्नाथ सूर्यवंशी (५४, रा.अष्टभुजानगर) असे मृताचे नाव आहे. ते मूळचे वढोदा (ता.चोपडा) येथील रहिवासी आहेत. सूर्यवंशी यांच्या शहरातील काही भागात बांधकाम साइट सुरू आहेत. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते वेगवेगळ्या साइटवर कामांची पाहणी करत होते.
दुपारी पोलिस ठाण्यासमोर सुरू असलेल्या अपार्टमेंटच्या साइटवर गेले. तळमजल्यावरील एका गाळ्यात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com